जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मू. जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरीय ‘व्हिडिओ स्पीच’ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वैभवात भर टाकली. ही स्पर्धा ७ जानेवारी २०२५ रोजी नंदुरबार येथील जी. टी. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पूर्वनिर्धारित विषयांवर तीन मिनिटांचा इंग्रजी भाषेतील व्हिडिओ तयार करून सादर करायचा होता. मू. जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध गटांमध्ये आपले उत्कृष्ट प्रदर्शन केले.
पदवी गटात उल्लेखनीय कामगिरी:
रुचिता गणेश सोनगिरे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
आदित्य रमेश वानखेडे याला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
पदव्युत्तर गटात शानदार यश:
मधुरा सचिन दुनाखे हिने प्रथम क्रमांक मिळवला.
प्रज्ञा शामसिंग सोलंकी हिने द्वितीय क्रमांकाची बाजी मारली.
प्रतीक भरत वरयानी याला उत्कृष्ट सहभागी विद्यार्थी म्हणून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. प्राचार्य स. ना. भारंबे, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे, अधिष्ठाता प्रा. भूपेंद्र केसूर, प्रा. पंडित चव्हाण, प्रा. योगिनी राजपूत, प्रा. कीर्ती सोनवणे, प्रा. सुनीता तडवी, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या प्रा. सुरेखा पालवे, अधिष्ठाता डॉ. अब्दुल आरसीवाला इत्यादींनी विद्यार्थ्यांना पाठबळ दिले.