जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीद्वारा १ ऑगस्ट पासून नवीन योग साधकांसाठी योग वर्गांना सुरुवात होणार आहे. या योग वर्गामध्ये नवीन साधकांना फिटनेसच्या दृष्टिकोनातून आवश्यक योगसाधना तज्ञ मार्गदर्शक शिकवणार आहेत.
तज्ञ मार्गदर्शकअंतर्गत पूरक हालचाली, सूर्यनमस्कार, विविध स्थितीतील आसने, शिथिलीकरण, योगनिद्रा, श्वसनाचे व्यायाम इत्यादी प्रकार शिकवले जाणार आहेत. तसेच नियमित योगसाधना करणार्या साधकांसाठी सराव बॅच सुद्धा एक ऑगस्ट पासून सकाळी 6 आणि 7 वाजता सुरू होणार आहे. विविध विकारांनी ग्रस्त असलेल्या साधकांसाठी सकाळी आठ वाजता उपचारात्मक योग वर्गाचे आयोजनही करण्यात आले आहे. विविध विविध विकारावर उपचारात्मक योगसाधना या वर्गात करून घेतली जाणार आहे. सोबतच महिलांसाठी सायंकाळी पाच ते सहा दरम्यान योग साधना वर्गाचे आयोजन करण्यात आले. तसेच योगाचे विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मायक्रो टीचिंग वर्कशॉपचे आयोजनही योग विभागाद्वारे करण्यात आले आहे. याचाही विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. योग साधने बरोबरच औषधाविना आरोग्य प्राप्त करण्यासाठी नैसर्गिक चिकित्सा सुद्धा योग अँड नॅचरोपॅथी विभागात महिला व पुरुषांसाठी उपलब्ध आहे. याचाही लाभआरोग्य प्राप्त करुन घेण्यासाठी करावा, असे आवाहन आयोजकांनी केले. योग आणि नॅचरोपॅथी क्षेत्रात करिअरसाठी आवश्यक प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रम सुद्धा महाविद्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी प्रवेश प्रक्रिये संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मू. जे.महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीयेथे किंवा 9112288110 / 9970985954 याक्रमांकावरसंपर्क साधावा.