जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मूळजी जेठा महाविद्यालयातील इतिहास विभागातर्फे सामाजिक शास्त्रातील संशोधन पद्धती या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटकीय सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ. भूपेंद्र केसूर हे उपस्थित होते. पहिल्या सत्रात जामिया मिलिया विश्वविद्यालय दिल्ली येथील प्रोफेसर डॉ.शफीक अहमद यांनी फिलोसोफी ऑफ सोशल रिसर्चेस, दुसऱ्या सत्रात नुतन मराठा महाविद्यालयातील डॉ. साहेब पडलवार यांनी सामाजिक शास्त्रातील सर्वेक्षण पद्धत या विषयावर मार्गदर्शन केले तर तिसऱ्या सत्रात डॉ. व्ही.एस. कंची यांनी ई लायब्ररी अँड ऑनलाईन रिसोर्सेस फॉर रिसर्च या विषयावर मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ.जुगलकिशोर दुबे यांनी केले डॉ. उज्वला भिरूड ह्या समारोप सत्राच्या अध्यक्षा म्हणून लाभल्या. सदर कार्यशाळेत विद्यार्थी व संशोधक मिळून एकूण 62 जणांची उपस्थिती या कार्यक्रमास होती.