जळगाव प्रतिनिधी । जागतिक निसर्गोपचार दिनानिमित्त मू.जे. महाविद्यालय संचालित सोहम डिपार्टमेंट ऑफ योग नॅचरोपॅथी येथे आज रविवारी 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते 10 या वेळात मडबाथ आणि योग निसर्गोपचार पंचमहाभौतिक चिकित्सा आणि योग निसर्गोपचार जनजागरण कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी यांच्याहस्ते ओमकार प्रतिमेस माल्यार्पणाने करण्यात आली.
कार्यशाळेस यांची होती उपस्थिती
यावेळी प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, सोहम डिपार्टमेंट ऑफ योग नॅचरोपॅथी विभागाच्या प्राचार्या सौ.आरती गोरे, प्रा.डॉ.देवानंद सोनार, प्रा. पंकज खासबागे, निसर्गोपचार समन्वयक तज्ञ अनंत महाजन, निसर्गोपचार समन्वयिका तज्ञ सोनल महाजन, प्रा. ज्योती वाघ, प्रा. डिंपल रडे, प्रा.रत्नप्रभा चौधरी यांच्यासह एम.ए. प्रथम वर्ष आणि सर्टीफिकेट ॲण्ड डिप्लोमा नॅचरोपॅथीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
प्रत्येकाने साधेसाधे चिकित्सा शिकवून घ्या – डॉ. उदय कुलकर्णी
यावेळी प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, निसर्गोपचाराच्या माध्यमातून अनेक आजार कमी होतात हे सिध्द झालेले आहे. निसर्गोपचाराची गरज प्रत्येकाला आहे, चांगल्या सवयी तरूण, तरूणींनी आत्तापासून लावून साध्या चिकित्सा शिकवून घेतले पाहिजे व वायफळ खर्च थांबावा. जेणे करून किरकोळ आजारासाठी आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही.
निसर्गाचा सहवास सुखकारक आहे- सौ.आरती गोरे
सोहम डिपार्टमेंट ऑफ योग नॅचरोपॅथी विभागाचे प्राचार्या सौ. आरती गोरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, मु.जे.महाविद्यालयात निसर्गोपच दिनाचे महत्व हे आपण विसरून गेलेलो आहे. निसर्गात आपण सुखवतो, विसावतो, रमतो, वावरतो व अनुभवतो, निसर्गाचा सहवास हा सुखकारक असल्याने तो प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. यासाठी प्रत्येकाने याचा अनुभव घेण्याची गरज आहे.
पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन
मु.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुळकर्णी यांच्याहस्ते पोस्टर प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी एम.ए. प्रथम वर्ष आणि सर्टीफिकेट ॲण्ड डिप्लोमा नॅचरोपॅथीच्या विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात पोस्टर तयार करून निसर्गातील उपलब्ध असलेल्या दुर्लभ वनऔषधाची माहिती व उपयोग चित्रासहित दाखविण्यात आला. तर काही विद्यार्थ्यांनी रांगोळी आणि फळाच्या माध्यमातून रांगोळी देखील साकारण्यात आली होती.
नैसर्गिक आहाराचा आनंद
एम.ए. प्रथम वर्ष आणि सर्टीफिकेट ॲण्ड डिप्लोमा नॅचरोपॅथीच्या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक आहार याची स्टॉल लावला होता. यात डाळिंब, डाळींबाचा ज्यूस, भोपळ्याचे पराठे, बिट ज्यूस, खजूर बर्फी, मोड आलेली धान्यांची उसळ, इडली, केळीचे पदार्थ आदी पदार्थांचा समावेश होता. आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यात सर्वांनी खाण्याचा आनंद लुटला.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/736582080180251/