जळगाव प्रतिनिधी । विद्यार्थ्याच्या कौशल्याला वाव देण्यासाठी स्पर्धा महत्वाच्या असतात. त्यामुळे उत्साह वाढतो आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो, असे प्रतिपादन प्रथितयश उद्योजक किशोर ढाके यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.
मंचावर प्रमुख पाहुणे किशोर ढाके, अध्यक्षस्थानी मू.जे.महाविद्यालयचे खजिदार डॉ. एस. आर चिरमाडे यांचेसह प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेचे संचालक सीए वाय. ए. सैंदाणे, वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉ.ए.पी.सरोदे, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रमुख सीए आरसीवाला उपस्थित होते. प्रस्तावनेत डॉ.ए.पी.सरोदे यांनी स्पर्धेची माहिती दिली. दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन झाले. किशोर ढाके म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धेत कौशल्य सादरीकरण करावे. विद्यार्थ्यांसाठी “मेस्ट्रो” स्पर्धा महत्वाची ठरणार असून यातील सहभाग भविष्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. यावेळी प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन व आभार मुग्धा कुलकर्णी आणि केतकी सावंत यांनी केले.
पारितोषिक वितरण
स्पर्धेच्या युगात आपले उत्पादन विक्री करण्यासाठी नैतिकतेने सामोरे जावे. जीवघेणी स्पर्धा कधीही करू नका. विद्यार्थ्यांनी आयुष्यात करिअर करीत असताना आपले कौशल्य अद्ययावत ठेवावे, असे प्रतिपादन यशस्वी उद्योजक स्वामी पोलिटेकचे सागर मंधान यांनी केले.
मेस्ट्रो २०१९-२० या राष्ट्रीय स्पर्धेचे पारितोषिक वितरण सागर मंधान यांचे हस्ते झाले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, वाणिज्य व व्यवस्थापन प्रशाळेचे संचालक सीए वाय.ए.सैंदाणे, वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉ. ए.पी.सरोदे, व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे प्रमुख सीए ए.एन.आरसीवाला उपस्थित होते.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परिश्रम
स्पर्धेचा आढावा डॉ. ए.पी.सरोदे यांनी घेतला. परीक्षकामधून प्रा निशांत घुगे व प्रा स्वनिल काटे यानी मनोगत व्यक्त केले. संघव्यवस्थापकान्मधे विजय पालवे, विद्यावर्धिनी कोलेज धुळे यानी मनोगत व्यक्त केले. स्पर्धकान्मधे कमल वाधवानी, विद्यावर्धिनी कोलेज धुळे याने मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन मुग्धा कुलकर्णी आणि केतकी सावंत यांनी केले. स्पर्धेसाठी डॉ. कल्पना नंदनवार, प्रा.सुरेखा पालवे, डॉ. संगीता पाटील, प्रा गायत्री खडके, डॉ.विवेक यावलकर, प्रा. विशाल देशमुख, प्रा नितीन चौधरी, प्रा प्रतिभा तिवारी, प्रा जास्मिन गाजरे, डा प्रदीप जोशी, डा प्रणव पाटील प्रा पल्लवी राणे, प्रा हर्शला देशमुख, प्रा आश्विनी जाधव, प्रा अश्विनी बारी, प्रा किरण बारी, प्रा धनश्री सुरळ्कर, प्रा. कोमल काजळे, प्रा अंकिता महाजन, प्रा वृषाली खाचने, प्रा. अमोल बावस्कर, प्रा.दिलवर वसावे, प्रा ज्योती पाटील,प्रा निलेश चौधरी, परिश्रम घेतले.
निकाल
जाहिरात विकास – प्रथम – निकिता शर्मा, रश्मी चौबे, खुशबू ठाकरे, सुलक्षणा ऋतुजा ( मू जे महाविद्यालय जळगाव) द्वितीय – मुस्कान मंसुर्वानी, आलेफिया बोहरि, योगेश वाघ, हरिश पाटिल आर सी पटेल आय एम आर डी शिरपुर) तृतीय – गायत्री चौधरी, शुभम चतुर, दीक्षा झंवर, प्रियांका वाघ ( जी एच रायसोनी कोलेज जळगाव) पीपीटी स्पर्धा – प्रथम – जयेश शिंपी (मू जे महाविद्यालय जळगाव)
द्वितीय – शिवानी वानखेडे, कोमल रजनि (आर सी पटेल आय एम आर डी शिरपुर), तृतीय – लविना चौधरी, प्राची जगवानी ( जी एच रायसोनी कोलेज जळगाव), ऑनलाईन स्टोक मार्केट गेम स्पर्धा –प्रथम – गौरव चव्हाण, देवेंद्र पाटील (मू.जे. महाविद्यालय), द्वितीय – जयेश लाठी , भूषण जोशी (मू.जे. महाविद्यालय) तृतीय – गौरव सोनोने (मू.जे. महाविद्यालय), प्रश्नमंजुषा स्पर्धा – प्रथम – कमल वाधवानी, प्रियंका गांधी, श्वेता जैन (v.w.s.arts, science, commerce college, dhule ) द्वितीय – मुग्धा कुलकर्णी, केतकी सावंत (मू.जे. महाविद्यालय). तृतीय –रिया दुगल, किमया रुंवाल, कल्याणी सारडा ( जी एच रायसोनी कोलेज जळगाव)
पीपीटी स्पर्धेत विद्यार्थ्यानी ई-बँकिंग, इन्कमटॅक्स, पेमेंट गेट वे अशा विविध विषयांचे प्रभावी सादरीकरण करीत परीक्षकांना जिंकून घेतले. २० संघातील ३६ जणांनी स्पर्धेत सहभाग घेतला. परीक्षण केसीई आयएमआर महाविद्यालयाचे प्रा निशांत घुगे व प्रा स्वप्नील काटे, मू जे वरिष्ठ महाविद्यालयचे गोपीचंद धनगर आणि स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगावचे प्रा अर्चना जाधव यांनी केले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत सामान्य ज्ञान, मनुष्यबळ व्यवस्थापन, मार्केटिंग, संगणकशास्त्र, अकौन्टिंग विषयी विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे उत्तरे दिलीत. या स्पर्धेत २१ संघातील ५७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. परिक्षण प्रा नम्रता नेमाडे आणि प्रा गोविंद पवार यान्नी केले. जळ्गाव, धुळे, भुसावळ, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, शिरपूर आदि ठिकाणाहून संघ सहभागी होते.