श्रीराम मंदिर येथील गोशाळेत ४५ गायींचे लम्पी प्रतिबंधात्मक लसीकरण

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बालहक्क संरक्षण समितीचे पाचोरा तालुकाध्यक्ष नीलेश मराठे यांच्या संकल्पनेतून व वृंदावन रुग्णालयाचे संचालक निळकंठ पाटील यांच्या प्रयत्नातून शहरातील जामनेर रोडवरील श्रीराम मंदिराच्या गोशाळेत आज “लम्पी” या आजाराला आळा घालण्यासाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहिमेत डॉ. परेश पाटील यांनी गोशाळेतील सुमारे ४५ गोवंशांना लसीकरण केले.

लसीकरणा प्रसंगी अयोध्या येथील विष्णुदासजी महाराज, श्रीराम मंदिर गादीपती निळकंठ महाराज, गजानन जोशी, बाल हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष मुकेश जगताप, तालुका अध्यक्ष निलेश मराठे, शहर अध्यक्ष नंदु शेलकर, बजरंग दल प्रखंड मंत्री योगेश सोनार, एन. एस. युवा मंचचे अध्यक्ष नंदु शेलार, गुरुलाल पवार (साजगांव), जितु लोणारी, अनुप जैन, गणेश कोळी, वाल्मिक महाराज, लकी पाटील, अनिल पाटील उपस्थित होते. लसीकरणानंतर डॉ. परेश पाटील यांनी गोवंशांची घ्यावयाची काळजी याबाबत संबंधितांना सुचना दिल्या.

Protected Content