नाशिक येथे कामानिमित्त गेलेले श्रीकृष्ण तायडे हरवलेत

WhatsApp Image 2019 05 24 at 6.08.52 PM

मलकापूर (प्रतिनिधी) महावितरण कंपनी मलकापूरचे कर्मचारी निम्‍मस्‍तर लिपिक श्रीकृष्ण प्रल्हाद तायडे (वय ३८ वष॑ ) हे महावितरणच्‍या ट्रॆनिंगसाठी नाशिक येथे दि २० मे गेले असता ते हरवले असून ते कोणाला आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

श्रीकृष्ण तायडे हे नाशिक येथे दि. २० मे रोजी सकाळी २.३० वाजता पोहोचलेत. त्‍यानंतर त्‍यांची बॅग व मोबाईल चोरी गेल्‍याचा फोन घरी आला. मात्र यानंतर ते ट्रॆनिंग सेटर येथे व कोठेच अद्यापपर्यत आढळून आले नाहीत. त्‍यांचा कुठलाही ठावठीकाणा लागला नाही. त्‍यांचे नातेवाईक त्‍यांचा शोध घेत आहेत. तरी कुणाला आढळल्‍यास त्‍वरीत कळवावे अशी विनंती करण्यात आली आहे. फोटोतील श्रीकृष्ण तायडे हे कोठेही आढळून आल्यास गणेश तायडे ९०१११ ७२६२७ व आनंद वाघ ८६२३८ ३३७७० या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

Add Comment

Protected Content