जल संवर्धनासाठी रेन वॉटर हार्वेस्टींग प्रणाली वापरण्याची महापौर भोळे यांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) राज्यासह शहरात पाणी टंचाई भासत असून जल संवर्धनासाठी रेन वॉटर हार्वेस्टींग प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन महापौर सीमा भोळे यांनी नागरिकांना केले आहे.

संपूर्ण राज्यासह शहरात पाण्याची टंचाई भासत असून जल बचत, जल संवर्धन करणे काळाची गरज बनली आहे. जळगाव महापालिकेतर्फे यापुर्वीच बांधकाम परवानगी देतांना प्रस्तावित इमारतीवर रेन वॉटर हॉवेस्टींग प्रणाली कार्यान्वीत करणे बंधनकारक केलेले आहे. यानुसारच बांधकाम परवानग्या देण्यात येत आहेत. जल बचतीव्दारे पाणी टंचाईवर उपाययोजना करणेसाठी सर्वांनी रेन वॉटर हॉवेस्टींग प्रणालीचा अवलंब करणे अत्यावश्यक असून याबाबत कार्यवाही करण्याबाबत महापौर सिमा भोळे यांनी आयुक्त उदय टेकाळे यांना पत्राव्दारे सूचित केले आहे.  यासंदर्भात नगरसेवकांना महापौर दालनात सुचना दिल्यात.  रेन वॉटर हॉवेस्टींग प्रणाली भविष्यात अत्यावश्यक असल्याने नगरसेवकांना शहरातील प्रतिष्ठाने, उद्योजक तसेच सामाजिक संस्था, समस्त नागरीकांनी आपआपल्या इमारतींमध्ये रेन वॉटर हॉवेस्टींग प्रणाली करून घ्यावी असे आवाहन महापौर भोळे यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content