यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील अट्रावल, भालोद शेत शिवारात गेल्या महिन्याभरात तीन वेळा केळी होळांचे नुकसान करण्यात आले. आज यावल शेत शिवारात पुन्हा गट नंबर८११ मध्ये ६ हजार केळीच्या कच्च्या झाडांची कापणी करून ८ लाख रुपयाचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये एकच घबराहट निर्माण झालेली असून पोलिसात गुन्हा दाखल होऊनही नुकसान करणारा अज्ञात हाती लागत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
दि.११ जानेवारी रोजी यावल पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या अट्रावल रस्त्यावरील निर्मल चोपडे यांच्या शेत शिवार गट नंबर ८११ मध्ये १२ हजार केळीचे खोड लागवड झालेले आहे. त्यातील सुमारे ६००० च्या वर केळीचे खोडांवरील परिपक्व न झालेले कच्चे घड अर्धवट छाटून सुमारे ८ लाख रुपयाचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटना नेहमी अट्रावल रस्त्याने का घडतात याचा शोध ना पोलिसांना लागत आहे.
मागील आवठडयात केशव गोवर्धन चौधरी राहणार अट्रावल यांच्या शेतामध्ये सुमारे ३००० केळीच्या खोडांची अशीच नास ,धूस करून अपरिपक्व खोडे अर्ध्या छाटून जमिनीवर फेकल्याची घटनासमोर आली आहे. यासंदर्भात आ.अमोल हरिभाऊ जावळे व तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मागील त्यातच पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली होती, मात्र अद्याप पावितो केशव गोवर्धन चौधरी यांच्या शेतातील गुन्ह्याचा तपास न लागता पुन्हा दुसरा गुन्हा पुढे आलेला आहे.
केळीचे महागडे रोप शेतकऱ्यांनी विकत घेऊन लागवड केलेली होती. आता एक ते दीड महिन्यामध्ये केळीची काटन परिपक्व झालेला माल हा व्यापाऱ्यास कापून दिला जाणार एक महिना आधी अपरिपक्व माल अर्धवट कापून फेकल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे .निर्मल चोपडे यांच्या शेतामधील दोन वर्षांपूर्वी असेच नुकसान झाले होते, यासंदर्भात चार दिवसांपूर्वीच कोर्टामध्ये केस प्रारंभ झाली आणि पुन्हा ही घटना का घडतात याचा कारणांचा वरिष्ठ स्तरावरून शोध घेणे गरजेचे आहे. या घटना गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आपल्या महसूलच्या पथकासह झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तात्काळ शेतामध्ये पोहोचल्या व त्यांनी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्याशी संपर्क केला व तात्काळ या अज्ञाताला शोध घेऊन त्यासाठी पथक तयार करून याचा तपास लावण्याची सूचना दिल्या.