अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील लोंढवे येथिल स्व.आबासो एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे उदघाटन शाळेचे चेअरमन डॉ. बी.एस.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक तथा भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब जिवन पाटील यांनी प्रास्ताविक केले. या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांनी रंगमंचावर आपले कला गुण सादर करत प्रेक्षकांची मने खिळवून ठेवली.विविध कलापूर्ण आविष्कारांनी आणि वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी संस्मरणीय ठरले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्या सौ सोनू राजू पवार,लोंढवे सरपंच कैलास खैरनार, वाघोदा सरपंच सौ बायजाबाई भिल,सौ मिनाबाई पाटील, जिजाबराव पाटील, नाटेश्वर पाटील, मच्छीन्द्र पाटील, प्रभाकर पाटील,लोंढवे ग्रामपंचायत सदस्य,उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी भाषणातून डॉ.पाटील यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाकरिता एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यान करावे व पालकांनी विद्यार्थ्यांना शेतात कामाला न पाठवता त्यांचा अभ्यास कडे लक्ष द्यावे, ग्रामिण भागातील शाळा प्रगती करत आहे आणि मातृभाषेतून शिक्षण यशस्वी जीवनासाठी कसे आवश्यक आहे त्याचे महत्त्व विषद केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सह शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम संस्मरणीय केला. सूत्रसंचालन शिक्षक दीपक पवार, मनोज पाटील यांनी केले. तर इतर शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्व उपस्थितांचे आभार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले