नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतासोबत स्वतंत्र झालेल्या व लोकशाही व्यवस्था स्वीकारलेल्या जगातील अनेक देशांत लोकशाही काही वर्षांतच लयाला गेली. तिथं हुकूमशाहीचा उदय झाला. मात्र, भारतात ७० वर्षांनंतरही लोकशाही टिकून आहे. याचे श्रेय पंडित नेहरूंना जाते,’ अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांना आदरांजली वाहिली.
राहुल गांधी एक ट्विट केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, भारतासोबत लोकशाही व्यवस्थेची वाट चालायला सुरुवात केलेल्या अनेक राष्ट्रांमध्ये आता हुकूशाही आली आहे. मात्र, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी निर्माण केलेल्या खंबीर, स्वायत्त आणि आधुनिक संस्थांमुळे आज ७० वर्षांनंतरही भारतातील लोकशाही जिवंत आहे, असे राहुल यांनी म्हटले. तत्पूर्वी, आज सकाळी यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी दिल्लीतील शांतीवन येथील स्मृतीस्थळी जाऊन नेहरूंना आदरांजली वाहिली.