पहूर, ता. जामनेर, (प्रतिनिधी ) महाराष्ट्रासह देशभरातील १६ राज्यातील ११८ लोकसभा मतदारसंघात आज तिसऱ्या टप्प्यात मतदान घेण्यात आले. आज तिसऱ्या टप्प्यात पहूर पेठ, पहूर कसबे शांततेत मतदान पार पडले. याठिकाणी मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते.
पहूर कसबे येथे ६ हजार ४९६ पैकी ४ हजार १८० मतदारांनी म्हणजेच ६४.३४ टक्के तर पहूर पेठ येथे ८ हजार ९८० पैकी ५ हजार ३१९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. पहूर पेठ येथे ५९ %मतदान झाले. मतदार यादीत आपले नाव शोधण्यासाठी मतदारांनी एकच गर्दी केली होती. मात्र मतदान यादीत नाव नसल्याने ते मतदार मतदानापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला.