जळगाव प्रतिनिधी । सुरू असलेल्या भांडणाचे कारण विचारल्याचा राग आल्याने एकाने लोखंडी रॉड तरूणाच्या डोक्याला मारहाण करत जखमी केल्याची घटना रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास हरी विठ्ठल नगरात घडली. याबाबत रामानंद नगर पोलीसात एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल सुनिल जाधव (वय – 22) रा. हरीविठ्ठल नगर हा जवळच असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील ओट्यावर रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास मित्र प्रविण नाना सोनवणे रा. तडवी गल्ली, हरी विठ्ठल नगर सोबात गप्पा मारत बसला होता. त्याचवेळी बाजूला राहत असलेला राकेश विठ्ठल सोनवणे यांचे भांडण सुरू होते. त्यावेळी हर्षलने कसले भांडण आहे. असे विचारल्याने राकेशला राग आला. दोघांमध्ये भांडण सुरू झाल्यानंतर राकेशने बाजूला पडलेला लोखंडी रॉड उचलून हर्षलच्या डोक्याला मारून जखमी झाली. याबाबत रामानंद नगर पोलीसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रवी नरवाडे करीत आहे.