लोखंडी बार डोक्यावर पडल्याने मजूर जागीच ठार

Crime

जळगाव प्रतिनिधी । सामनेर येथून जवळ असलेल्या नांद्रा शेत शिवारात बोरींगचे काम करत असतांना डोक्यावर लोखंडी बार पडल्याने 18 वर्षीय तरूण मजूराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर येथून जवळ असलेल्या नांद्रा शेत शिवारात सोमवार 7 मे रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास सुरज बीबा अरमा (वय-18) रा. जीवन गटा, ता. एट्टापल्ली जि. गडचिरोली हा बोरींगचे काम करत असतांना वरून लोखंडी बार डोक्यावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तातडीने त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. याबाबत रामानंद नगर पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोहेकॉ विकास देशमुख आणि पोना ललीत भदाणे करीत आहे.

Add Comment

Protected Content