पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील लोहारी येथील डॉ.भुषण महाजन यांच्या बंद घरांचे कुलूप तोडून रोख रकमेसह दागीने लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यान खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील लोहारी येथे घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. डॉ भूषण महाजन यांच्या पत्नी ला पाचोरा येथील वेदांत हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे घरी कोणीही नसल्याने याचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी लोहारी असलेल्या घरात दरवाज्याची कडी-कोंडा तोडून ५ ग्रॅमच्या दोन चेन आणि नऊ ग्रामचे कानातले टोंगल, १० ग्रामच्या अंगठ्या व रोख रक्कम ४०,००० असा ऐवज लंपास केला आहे. आज सकाळी त्यांचे कंपाउंडर सात वाजता घरी आले असता त्यांना घराची कडी तोडल्याचे दिसून आले व घरात पाहता चोरी झाल्याचे समजले. याबाबत पिंपळगाव हरेशवर पोलीस स्टेशन माहिती दिली असताना आतापर्यंत कुठलेही पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नाही. या महिन्यात चार ते पाच घरफोड्या झाल्या असून आहेत या कडे पिंपळगाव पोलीस प्रशासन काय भूमिका घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे