जिल्हा परिषदमाधील पदाधिकार्‍यांच्या दालनाला कुलूप

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी पदाधिकार्‍यांसह सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी प्रशासक पदाची सूत्रे स्वीकारली असून मंगळवारी जि.प अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह चार सभापतींच्या शासकीय दालनाला कुलूप लावण्यात आल्याचं चित्र दिसून आलं.

तसेच महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील यांच्या दालनावरील नेमप्लेट वगळता सर्व सभापतींच्या दालनावरील सर्वांच्या नेमप्लेट काढण्यात आली आहे. जिल्हा परिषदेवर सोमवारी प्रशासक नियुक्त झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषद अध्यक्ष रंजना पाटील,  उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती उज्ज्वला म्हाळके आदींची शासकीय वाहने जमा करण्यात आली होती.

मंगळवार, दि.२२ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्‍यांची शासकीय दालने कुलूपबंद करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे काम करणारे वाहन चालक आणि शिपाई यांना मूळ कामांच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश प्रशासक सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी आज दिले आहे. त्यामुळे दि.२३ मार्च रोजी सर्व कर्मचारी, स्वीय सहाय्यक हे मूळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश प्रशासक सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी आज दिले आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार अध्यक्ष,उपाध्यांसह चार सभापतींना कार्यालयीन कामकाजासाठी जिल्हा परिषदेकडून पुरविण्यात आलेले  स्वीय सहाय्यक, वाहन चालक, परिचर यांना मूळ नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश प्रशासक सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी आज सर्व  संबंधित कर्मचार्‍यांना सूचित केले आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून कार्यवाही करण्यात आली आहे. जि.प.अध्यक्ष-४, उपाध्यक्ष-३,प्रत्येक सभापतींकडे ३ कर्मचारी आणि वाहन चालक असे एकूण २५ कर्मचारी मूळ नियुक्तीच्या ठिकाणी कंट्रोलमध्ये जमा झाले आहे.

जिल्हा परिषदेच्या सत्ताधारी पदाधिकार्‍यांसह सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा परिषदेवर प्रशासकीय राजवट लागू झाली आहे. तसेच जि.प.च्या मंजूर कामांवरी स्थगिती सोमवारी उठल्याने आज जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ठेकेदारांची गर्दी वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या इतर विभागात कर्मचारी वगळता त्यांच्या कार्यालयात शांतता होती.मात्र, जि.प.बांधकाम विभागात  ठेकेदार आणि सदस्यांची मोठी वर्दळ वाढली आहे. त्यातच आता मार्चएण्ड जवळ येत असल्याने सर्वांनाच कामे उरकण्याची घाई झाली आहे.

Protected Content