यावल (प्रतिनिधी) येथील पोलिसांनी काल रात्री दहिगाव शिवारात अवैध वाळु वाहतुक करणारा ट्रक पकडुन तो महसुल प्रशासनाकडे सोपवला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, काल रात्री (दि.२३) ११.३० वाजेच्या सुमारास यावलपासुन जवळच असलेल्या सातोद दहिगाव मार्गावर गस्तीवर असलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक सूजीत ठाकरे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने अनधिकृतपणे वाळुची वाहतुक करणारी ट्रक (क्रमांक एम.एच. ४७, ए.के.७८६०) या वाहनाचा पाठलाग करून वाहन चालक बाळु दिनकर साळुंके रा.कोळन्हावी, ता. यावल याच्या ताब्यातील वाहनाची चौकशी केली असता त्यातून वाळुची अनधिकृत वाहतुक करीत असल्याचे आढळुन आले. पोलिसांनी सदरचे वाहन हे तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांच्याकडे सुपूर्त केले आहे. सदर वाहनाच्या मालकास ठंड भरण्याची नोटीस महसुल प्रशासनाच्या माध्यमातून बजावण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसात महसुल प्रशासनाने वाळु तस्करीविरूद्ध सुरु केलेल्या मोहिमेत दंड वसूलीचा आकडा १४ लाखांच्या जवळपास पोहोचला आहे.