जळगावात एल.के. फाऊंडेशनतर्फे ५१ फुटी रावण दहनाचे आयोजन

 

ravan 1445503414 835x547

जळगाव प्रतिनिधी । शहरात विजया दशमीनिमित्ताने (दि.8) मेहरूण तलाव येथे एल.के. फाऊंडेशनतर्फे ५१ फुटी रावण दहनाचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रावण बनविण्यासाठी बांबु, बल्की, यांचा वापर न करता लोखंडी फोल्डींगमध्ये रावण तयार करून पर्यावरण संवर्धन करण्याचा मानस बाळगुण यंदाचा रावण तयार करण्यात येत आहे. यावेळी फटाक्यांची सुंदर आकर्षक रोशणाईसाठी संगमनेर येथील जमीर भाई हे सुमारे १ हजार २०० ते १ हजार ५०० आकाशात फुटणारे फटाके तसेच जमीनीवरील फटाक्यांचा आकर्षक असा रंगतरंग रोषणाईचा आविष्कार यंदा जळगावकरांना अनुभवता येणार आहे. रावण दहन ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आ.राजूमामा भोळे, खा.उन्मेश पाटील, आ.चंदु पटेल, ना.गुरूमुख जगवाणी, ना.गुलाबराव पाटील, महापौर सिमा भोळे, नगरसेवक, पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवास जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पियुष कोल्हे यांनी केले आहे.

Protected Content