Home क्राईम अंतूर्ली शिवारातून पशूधनाची चोरी ; शेतकऱ्यांचे अडीच लाखांचे नुकसान

अंतूर्ली शिवारातून पशूधनाची चोरी ; शेतकऱ्यांचे अडीच लाखांचे नुकसान


मुक्ताईनगर लाईव्ह‍ ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली शिवारातून अज्ञात चोरट्यांनी चार महागड्या जर्सी गाई चोरून नेल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी समोर आली आहे. अरविंद प्रभाकर पाटील (वय ६९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चोरट्यांनी ६० हजार ते ७० हजार रुपये किमतीच्या एकूण चार गाई, ज्यांची एकूण किंमत २ लाख ४५ हजार रुपये आहे, त्या गोठ्यातून चोरून नेल्या. या गाईंना विशिष्ट बिल्ला लावलेले होते. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सपोनि राजेंद्र चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पशुधनाची अशा प्रकारे चोरी होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.


Protected Content

Play sound