1पाचोरा प्रतिनिधी । येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी नाशिक येथील लिव्हर व प्रत्यारोपणतज्ञ डॉ.शरद देशमुख रूग्णांवर उपचार करण्यासाठी उपलब्ध असतात, या महिन्यातही येत्या १० सप्टेंबर रोजी ते उपलब्ध असतील.
विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रोस्कोपी, एन्डोस्कोपी, कोलोनोस्कोपी, लिव्हर फॅब्रोस्कॅनच्या सहाय्याने उपचार केले जातात. पोटाच्या सर्व आजारांवर दुर्बिणीद्वारे आतड्यांची तपासणी करून उपचार केले जातात. अँसिडिटी, गँस, अपचन, उलटी होणे, रक्ताची उलटी होणे, काळी संडास होणे सांडसातून रक्त जाणे, बध्दकोष्टता, काविळ, पित्ताशयातील खडे, स्वादुपिंडाचे खडे, पँनक्रियाटायटिस, (अन्न नलिका,पोट,आतडे,पित्ताशय व स्वादुपिडांचे कँसर), छातीत व पोटात सतत दुखणे, गिळण्यास त्रास होणे-जेवतांना अन्न अडकणे, पोटात पाणी होणे, असे लिव्हर व पोटाशी संबंधित कोणत्याही आजाराची लक्षणे दिसून येत असल्यास रूग्णांनी येत्या मंगळवार १० सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत अवश्य येवून लिव्हर स्पेशालिस्ट डॉ. शरद देशमुख यांच्याकडून उपचार करवून घ्यावेत व या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विघ्नहर्ता हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.