Home राजकीय LIVE : साताऱ्यात मनसेची सभा सुरु ; राज ठाकरेंची तोफ थोड्याच वेळात...

LIVE : साताऱ्यात मनसेची सभा सुरु ; राज ठाकरेंची तोफ थोड्याच वेळात धडाडणार


Raj Thackeray
 

सातारा (वृत्तसंस्था) पंतप्रधान मोदी आणि शहामुक्त भारतासाठी महाराष्ट्रभर सभा घेण्याचे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी जाहीर केले होते. त्यानुसार ठाकरे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील सभा सुरु झाल्या आहेत. कोल्हापूर नंतर आज मनसेची साताऱ्यातील गांधी मैदानावरील सभा सुरु झाली असून राज ठाकरे यांची तोफ थोड्याच वेळात धडाडणार आहे.

 

सातारा मतदार संघात आघाडीचे श्री. छ. उदयनराजे भोसले व महायुतीचे नरेंद्र पाटील यांच्यात लढत आहे. त्यासाठी बुधवारी (दि. 17) मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस दुपारी सभा घेतली तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा नुकतीच सरू झाली आहे. सांगता सभांसाठीही शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याही सभा शेवटच्या टप्प्यात होणार आहेत. दरम्यान, साताऱ्यातील गांधी मैदानावरही भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्याप्रमाणेच या सभेतही मंचावर दोन स्क्रिन असून भाषणाबरोबरच या स्क्रिनवर राज ठाकरे सादरीकरणही करणार आहेत.

 

https://www.facebook.com/MaharashtraNavnirmanSenaAdhikrutPage/videos/311954556163953/


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound