नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसने जाहीरनामा घोषित करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. यामध्ये अनेक लोकानुनयी घोषणांचा समावेश आहे.
11 एप्रिलपासून पहिल्या टप्प्यातले मतदान सुरू होईल. त्यामुळे या जाहीरनाम्यात नेमकी काय काय आश्वासने देण्यात आली आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्याय योजनेचा समावेश असेल. कारण काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत या योजनेची घोषणा केली होती. याशिवाय 22 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचा समावेशदेखील काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असू शकतो. दरम्यान, जाहीरनामा सादर करण्यापूर्वी देशभरातील जनतेचे सर्वेक्षण करून त्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. देश सध्या ज्या समस्यांना सामोरे जात आहे त्या सर्वच समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न यातून केला जाणार आहे. त्यातही प्रामुख्याने देशात रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या योजनांवर भर दिला जाणार असे राहुल गांधींनी यापूर्वीच स्पष्ट केले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या प्रचार सभा आणि सोशल मीडियावरून देशभरातील युवकांना केंद्रात 22 लाख नोकऱ्या, 25 कोटी गरीब जनतेला दरवर्षी 72 हजार रुपये (न्याय योजना) आणि देशातील जीडीपीचा 6 टक्के भाग शिक्षणावर खर्च करणार असे आश्वासन आधीच दिले आहे.
https://www.facebook.com/IndianNationalCongress/videos/2389510627740143/