पारोळा (प्रतिनिधी) मतदार संघातील विकास कामांसह संसदेतील माझ्या कामाचा अहवाल चांगला होता.तरी देखील माझी उमेदवारी कापण्यात आली. हा एकप्रकारे माझ्यावर अन्याय असल्याचे म्हणत खासदार ए.टी.पाटील हे आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. या मेळाव्याला सुरुवात झाली असून कार्यकर्त्यांची तुफान गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.
दोन दिवसापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खा. पाटील म्हणाले होते की, उमेदवारी नाकारून पक्षाने माझ्यावर अन्याय केला आहे. उमेदवारी का नाकारली? या बाबत मात्र पक्षाने कोणतेही कारण सांगितले नाही. त्यामुळे या बाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेत पुढील भूमिका ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. यामुळे आता सुरु असलेल्या या मेळाव्याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागलेले आहे.
https://www.facebook.com/100004454411355/videos/1258008564357612/