रावेर शालिक महाजन । तुम्ही सुध्दा आयएएस-आयपीएस होऊ शकता यासाठी फक्त महेनत आणि जिद्द हवी सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा सुध्दा उच्च पदावर काम करू शकतो यासाठी तुम्ही तयार असायला हव असे आवाहन पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनीना केले .
रावेर पोलिस स्टेशनची वार्षिक तपासणी होती त्यासाठी डॉ मुंढे रावेर आले होते सुरुवातीला पोलिस स्थानकाच्या विविध विभागाची पाहणी केली त्यानंतर नागझीरी चौक विश्राम कक्षाचे उदघाटन केले व त्यानंतर पोलिस कवायत मैदान येथे पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन केले व उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा- परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले.यावेळी मोठ्या संखने विधार्थी उपस्थित होते.यावेळी पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे सहायक पोलिस निरिक्षक शितलकुमार नाईक स्वप्निल उणवने पोलिस उप निरीक्षक मनोज वाघमारे मनोहर जाधव उपस्थित होते.
जिद्द असेल आणि महेनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही पोलिस शिपाई काय आयएएस, आयपीएस कोणतेही पद तुम्ही मिळवु शकता. सद्या सरकारी नोकरी मिळणे खुप दुर्मिळ झाले असून मी स्वतः एक सर्व साधारण कुटुंबातला असून माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. आई गृहणी आहे. माझा चुलत भाऊ सुध्दा आयपीएस असून त्याचे आई-वडील सुध्दा शेतकरी आहे. आमचे दोघांचे शिक्षण गाव-खेडयात झाले माझा २००३ मध्ये नवी मुंबईत एमबीबीएस’ला नंबर लागला त्यानंतर मी २००९ मध्ये मध्ये दिल्ली’ला आयएएस-आयपीएसच्या तयारीसाठी गेलो. तेथे २०१० ची लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन मी पहिलाच प्रयत्नात आयपीएस झालो. या पदापर्यंत पोहचण्यासाठी मी सण-वार, उत्सव सर्व सोडुन किमान दहा-ते-बारा तास सतत अभ्यास करायचो त्यामुळे रडत बसण्यापेक्षा आताच्या मुलांनी ध्येय मोठे नक्की ठेवा. परंतु आहे तिथे देखील समाधन असावे. दर वर्षी भारत भरात सुमारे एक हजार पदासाठी लोकसेवा आयोग परीक्षा घेते त्यासाठी आपण तयार असायला पाहिजे असे पोलिस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.
जिल्हात २५० जागांसाठी होईल पोलिस भरती
आगामी पोलिस भरतीमध्ये आधी ग्राउंड घेतले जाईल त्यानंतर ग्राउंडमध्ये उतीर्ण होणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. जळगाव जिल्हात किमान २५० जागांसाठी पोलिस भरती प्रक्रीया राबवली जाणार असल्याचे डॉ. मुंढे यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की २०१९ मध्ये १९० जागांचा प्रस्ताव पाठवला होता परंतु यावर्षी तो वाढवून २५० असेल त्यामुळे जास्तीत-जास्त लाभ घेण्याचे अवाहन यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/466225924379045