नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतात दरवर्षी हजारोंच्या संख्येने बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्यास येतात. या पार्श्वभूमीवर अवैधरित्या भारतात घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची यादी भारताने बांगलादेशला द्यावी. त्या सर्वांना आम्ही पुन्हा स्वदेशी परततण्याची मंजूरी देऊ, असे वक्तव्य बांगलादेशचे पराराष्ट्र मंत्री ए.के. अब्दुल मोमेन यांनी केले आहे. रविवारी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत (एनआरसी) मोमेन यांना विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केले.
गेल्या आठवड्यात बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री मोमेन यांचा नियोजित भारत दौरा त्यांनी रद्द केला होता. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी हा भारताचा अंतर्गत मामला आहे आणि याचा बांगलादेशवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. काही भारतीय नागरिक आर्थिक कारणामुळे बेकायदेशीरपणे बांगलादेशात घुसखोरी करत असल्याचेही ते म्हणाले. जर आमच्या नागरिकांव्यतिरिक्त इतर कुणी घुसखोरी केल्यास आम्ही अशांना परत पाठवू, असेही मोमेन प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.