शहरात अयोध्या प्राणप्रतिष्ठानिमित्त २२ जानेवारीला मद्य बंदी करावी; मनसेची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्रीराम मंदिर स्थापनाच्या निमित्ताने शहरात येत्या २२ जानेवारी रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये, या दृष्टीने स्थानिक पोलीस प्रशासनाने शहरात विक्री होणाऱ्या दारू विक्री बंद करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येत्या २२ जानेवारी रोजी आयोध्या येथे मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम यांच्या भव्य अशा मंदिराची स्थापना होत आहे. या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. याच दिनांचे औचित्य साधून यावल शहरात २२ जानेवारी रोजी यावल शहरात श्रीराम यांच्या प्रतिमेची भव्य अशी शोभायात्रा निघणार आहे.

यासाठी यावलच्या स्थानिक पोलिस प्रशासनाने २२ जानेवारी रोजी शहरात मोठया प्रमाणावर विक्री होणाऱ्या मद्य विक्रीमुळे एखाद्या दारूड्या समाजकंटक व्यक्ति कडून शांतता भंग होऊन कायदा सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी शहरातील दारू बंद करावी अशी मागणी पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाचे राज्य उयाध्यक्ष चेतन अढळकर यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावल तालुका अध्यक्ष किशोर नन्नवरे, तालुका उपाध्यक्ष शाम पवार, यावल शहराध्यक्ष गौरव कोळी यांच्या स्वाक्षरी आहे .

Protected Content