Home राजकीय मला ट्रोल करणाऱ्यांना कार्यकर्ते ठोकून काढतील : प्रकाश आंबेडकर

मला ट्रोल करणाऱ्यांना कार्यकर्ते ठोकून काढतील : प्रकाश आंबेडकर


4prakash ambedkar 0

अकोला (वृत्तसेवा) आता मी भूमिका बदलणार आहे. सुपारी घेऊन ट्रोल करणाऱ्यांना कार्यकर्ते बघतील. पत्रकारांबद्दल बोलणार नाही. मात्र राजकीय लोकांबद्दलही ही भूमिका असल्याचे सांगत मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह संवेदनशील नव्हते. अमित शाहांनी हल्ल्याशी संबंधित वायरल केलेले फोटो 2005 मधील होते, असा दावाही आंबेडकरांनी केला. पुलवामा हल्ल्यामागचा नेमका हेतू काय होता? हे अद्यापही समजलेले नाही. दरम्यान,आंबेडकर यांनी आपल्याला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढण्याची थेट सूचनाच कार्यकर्त्यांना दिल्यामुळे भविष्यात मोठे वाद होण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound