पाचोरा प्रतिनिधी । येथील विजांच्या तारांची दुरूस्ती करतांना जखमी झालेले वायरमन रवींद्र त्र्यंबक जाधव यांना वेळीच विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आल्याने त्यांचा जीव वाचला.
याबाबत वृत्त असे की, पाचोरा ते जळगाव रस्ता चौपदरीकरण करण्याचे काम मिळालेल्या अशोका बिल्डकॉनतर्फे विजेचे तार दुरूस्तीचे काम सध्या सुरू आहे. या अनुषंगाने खासगी कंत्राटदारांकडे कामास असणारे वायरमन रवींद्र त्र्यंबक जाधव हे काम करत असतांना अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने त्यांना जोरदार शॉक लागला. परिसरातील लोकांना जाधव यांना तातडीने डॉक्टरकडे नेले. यानंतर त्यांना विघ्नहर्ता सुर स्पेशालिटी रूग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. येथे डॉ. भूषण मगर व डॉ. सागर गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर डॉ. अविनाश महालपुरे यांनी तातडीने उपचार केले. यामुळे अवघ्या काही तासांमध्ये रवींद्र जाधव हे शुध्दीवर आले असून आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
विजेच्या शॉकसह विविध प्रकारे जखमी झालेल्या आपत्कालीन रूग्णांना आधी जळगावला जाण्यावाचून कोणताही पर्याय नव्हता. तथापि, विघ्नहार्ता सुपर स्पेशालिटी रूग्णालयात सर्व प्रकारच्या आपत्कालीन सुविधा उपलब्ध असल्यामुळे परिसरातील रूग्णांवर वेळीच उपचार होऊन त्यांचा जीव वाचत आहेत. रवींद्र जाधव यांनाही वेळीच येथे उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.
पहा : व्हिडीओ !