अयोध्येतील दहशतवादी हल्ल्यातील चौघांना जन्मठेप

INDIA BLASTS 011 621x414

अयोध्या (वृत्तसंस्था) येथील राम जन्मभूमी परिसरात २००५ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी प्रयागराज येथील विशेष न्यायालयाने आज दोषी ठरलेल्या पाचपैकी चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर एका आरोपीची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

 

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ६३ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव अंतिम सुनावणी प्रयागराजच्या नॅनी सेंट्रल जेलच्या अस्थायी विशेष न्यायालयात झाली. येथे पाचही आरोपी इरफान, मोहम्मद शकील, मोहम्मद नसी, मोहम्मद अजीज आणि आसिफ इकबाल ऊर्फ फारुख कोठडीत होते.
५ जुलै २००५ रोजी सकाळी ९.१५ च्या राम जन्मभूमी परिसरातील संरक्षक जाळी आणि आसपासच्या परिसरात अत्याधुनिक शस्त्रांनी अंदाधुंद गोळीबार करत बॉम्बस्फोट करण्यात आला होता. यात सुरक्षेसाठी तैनात असलेले अनेक जवान जखमी झाले होते. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाच दहशतवादी ठार झाले होते. त्यानंतर आणखी पाच आरोपींना अटक करण्यात आली. या हल्ल्यात दोन सामान्य नागरिकही ठार तर सात अन्य जखमी झाले होते.

Protected Content