लेवा रत्न पुरस्कारांचे थाटात वितरण ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । अखील भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे आज लेवा रत्न पुरस्कारांचे थाटात वितरण करण्यात आले.

लेवा पाटीदार युवक महासंघाने काही दिवसांपूर्वीच समाजातील विविध मान्यवरांना लेवा रत्न पुरस्कार घोषीत केले होते. आज याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कुटुंबनायक रमेशदादा पाटील, आमदार राजूमामा भोळे, महापौर सीमाताई भोळे, जळगाव पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, वामनदादा खडके, अ‍ॅड. संजय राणे, माजी महापौर आशाताई कोल्हे, माजी नगराध्यक्षा सिंधूताई कोल्हे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांना लेवारत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. यामध्ये दिवंगत दिलीपबापू कोल्हे यांना सामूदायिक विवाह चळवळ सुरू केल्याबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पहा : लेवारत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचा हा व्हिडीओ वृत्तांत.

Add Comment

Protected Content