मिशीगनमध्ये उत्साहात पार पडले लेवा पाटीदार संमेलन !

नॉर्थव्हिले, मिशिगन-नितीन नारखेडे | अमेरिकेतील मिशिगन राज्यातल्या नॉर्थव्हिले शहरात स्थानिक लेवा पाटीदार समाजबांधवांचे संमेलन नुकतेच उत्साहात पार पडले.

मूळचे भुसावळकर तर सध्या अमेरिकेतील मिशिगन राज्यात स्थायिक झालेले नितीन नारखेडे यांनी विशाल महाजन यांच्यासह अन्य स्थानिक समाजबांधवांच्या मदतीने एप्रिल 2019 मध्ये लेवा पाटीदार समाजबांधवांचा ग्रुप सुरू केला. प्रारंभी सात-आठ कुटुंबांचा हा ग्रुप वाढत गेला. कोरोना काळात या एकत्रीकरणाला चालना मिळाली. यातील अनेक कुटुंबे हे एकमेकांशी भेटत असले तरी कधी तरी सर्व सदस्यांनी एखाद्या संमेलनाच्या माध्यमातून एकत्र यावे असा विचार समोर आला.

यातूनच नितिन नारखेडे, निलिमा नाफडे, निखिल इंगळे, तुषार चौधरी यांच्या नियोजनातून आणि रवींद्र पाटील, अनिता नारखेडे, विशाल महाजन, ललित नारखेडे व अन्य क्रियाशील लेवापाटीदार बांधवांच्या संयुक्त सहभागातून मिशीगन मधील लेवा समाजाचे प्रथम संमेलन 25 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील मिशीगन राज्यात असलेल्या नॉर्थव्हिले या ठिकाणी पार पडले.

या सम्मेलनाला वय वर्षे 7 महिने पासून तर 80 वर्षे पर्यंतच्या विविध वयोगटातील 75 जणांनी हजेरी नोंदविली. सकाळच्या नाश्त््यााला कचोरी आणि दुपारच्या जेवणात लेवा पाटलांचा प्रसिद्ध खाद्य पदार्थ भरीत पुरी सोबत बटाट्याची भाजी, भात, मठ्ठा आणि जिलेबी असा मेनू होता. दुपारी कलींगडासह खास फलाहाराची व्यवस्था देखील करण्यात आली होती. दुपारी गेम्स मधे लहान मुले, महिला, पुरूष अशा तीन गटात संगीत खुर्चीत जवळपास सर्वांनीच भाग नोंदविला. त््याांनतर पिक्शनरी या गेम मधे सर्व उपस्थित लेवा गण रमलेत.

या संमेलनातील लक्षणीय बाब अशी की वांगी भाजण्यापासून तर भरीत बनविण्यापर्यंत, तर कोशिंबीर बनविणे, मठ्ठा आणि बाकी सगळे पदार्थ करण्यात सर्व लेवा बंधु भगिनींनी उत्स्फूर्तपणे, स्वतः हून पुढाकार घेवून ही कामं केलीत. रोजच्या नोकरी किंवा व्यवसाया ठिकाणचे ताणतणावाचे वातावरण विसरून एक दिवस सर्वांनी फुल्ल एंजॉय केला.

या संमेलनात सहभागी झालेल्यांनी अतिशय भरभरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विशेष करून साता समुद्रा पलिकडे ही लेवा संस्कृती टिकवून याचा खुप अभिमान वाटतो आहे. असल्या सम्मेलनांच्या माध्यमातून लेवा समाजाचे अस्तित्व परदेशात ही टिकून राहत असते, समाजाची अस्मिता जपली जात असल्याबाबत समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले. तर अशा प्रकारची संमेलने नियमीतपणे आयोजीत करण्याचा संकल्प देखील याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

Protected Content