Home राजकीय लेवा समाजाच्या दोन सुना सावद्यात उभे करणार जबरदस्त आव्हान !

लेवा समाजाच्या दोन सुना सावद्यात उभे करणार जबरदस्त आव्हान !

0
647

सावदा, ता. रावेर- जितेंद्र कुलकर्णी | आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपद हे एससी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असतांना लेवा पाटीदार समाजातील दोन सुना मैदानात उतरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे येथील नगराध्यक्षपदासाठी त्या जबरदस्त आव्हान उभे करणार असल्याचे मानले जात आहे.

सावदा शहरात होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोर पकडू लागली असून विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर लेवा समाजातील दोन सुना दिपाली राहुल धांडे आणि रेणुका राजेंद्र पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपले नशीब आजमावण्याचा निर्धार केला आहे. दोन्ही उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातून असून, सावदा शहरात त्यांच्या उमेदवारीमुळे चर्चेला उधाण आले आहे.

या दोन्ही अनुक्रमे रेवा बळीराम धांडे आणि शरद पाटील यांच्या सुना आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही महिलांनी निवडणुकीसाठी लागणारी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असून, घराघरात जाऊन मतदारांशी संपर्क साधण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. या दोन्ही उमेदवारांनी समाजातील महिलांना राजकारणात स्थान मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला असून, सामाजिक कार्य आणि विकासाच्या माध्यमातून सावदा शहराचा चेहरा बदलण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले आहे.
शहरात या दोन उमेदवारांच्या उमेदवारीमुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळेल, असा जनमत व्यक्त होत आहे.

सावदा शहरात लेवा पाटीदार समाजाचे मतदान हे निर्णायक आहे. एका अर्थाने हा समाज नेहमीच ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असतो. खरं तर यंदाच्या निवडणुकीत आरक्षणामुळे समाजाचा थोडा विरस झाला होता. तथापि, रेणुका राजेंद्र पाटील आणि दिपाली राहूल धांडे यांच्या माध्यमातून समाजाला पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. ही संधी विजयात परिवर्तीत होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound