जळगाव प्रतिनिधी । युवा विकास फाऊंडेशन व सरदार वल्लभभाई पटेल बहुद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या 670 गुणवंतांचा गौरव सोहळा मान्यवरांच्या हस्ते आज (21 रोजी) लेवा भवनात करण्यात आला.
आजचा निर्णय उद्या करीयर – सुरेशदादा जैन
यशस्वी विद्यार्थ्यांनी चांगले जिवन जागण्यासाठी चांगल्या शिक्षणाची कास धरावी. आजचा निर्णय उद्या करीयर या भूमीकेतून चांगला अभ्यास करून जीवनात पुढे जा, असे आवाहन माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी केली.
यांची होती उपस्थिती
सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील, माजी गृहनिर्माणमंत्री सुरेशदादा जैन, लेवा पंचायतचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील, महापौर सीमाताई भोळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, आयोजक माजी महापौर विष्णु भंगाळे, प्रख्यात शल्यचिकित्सक डॉ. स्नेहल फेगडे, देवगिरी प्रांत सहमंत्री ललित भैय्या चौधरी, ग.स. सोसायटी अध्यक्ष मनोज पाटील, अरीहंत अकॅडमीचे संचालक कबीर वासंती शेखर, एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्राचार्य डॉ.स.ना.भारंबे, मनपाविरोधी पक्षनेते डॉ. सुनील महाजन, शिवसेना जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) गुलाबराव वाघ, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, माजी महानगराध्यक्ष गजानन मालपुरे, माजी नगरसेवक श्याम कोगटा, नगरसेवक प्रशांत नाईक, युवा सेना जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, ग.स.चे माजी उपाध्यक्ष महेश पाटील, भावसार समाज अध्यक्ष अशोकराव भावसार, प्रख्यात फिजिशियन डॉ.किरण पाटील यांच्यासह आदी समज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.