Home Cities पारोळा पोस्ट कार्यालयातील आधार केंद्राची वेळ वाढवण्यासाठी पोस्ट मास्तरांना निवेदन

पोस्ट कार्यालयातील आधार केंद्राची वेळ वाढवण्यासाठी पोस्ट मास्तरांना निवेदन


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील पोस्ट कार्यालयातील आधार केंद्रांची वेळ वाढवण्यासाठी माहिती अधिकारी कार्यकर्ता जाकिर उस्मान पिंजारी आणि राहूल देवीदास सरदार यांनी सब पोस्ट मास्तरांना निवेदन दिले.

या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की, सध्या राज्यात महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फार्म भरले जात आहे. पारोळा तालुक्यातील आजूबाजूच्या खेडयापाडयातून महिला आधार केंद्रात या योजनेसाठी लागणारे आधार कार्ड अद्यावत नसल्याने येतात. त्यामुळे पोस्ट कार्यालयातील आधार केंद्राची वेळ वाढवावी अशी मागणी माहिती कार्यकर्ता जाकीर पिंजारी व राहूल सरदार यांनी सब पोस्ट मास्तरांना केली आहे.


Protected Content

Play sound