जळगाव (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीत नवमतदारांनी उत्साहाने व हिरीरीने सहभागी होऊन मतदान करावे व लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा. देशाच्या उज्वल भविष्यासाठी तरुण पिढीने मतदान करून आपले योगदान देऊन इतिहासाचे साक्षीदार व्हावे. असे आवाहन निवडणूक निरीक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा यांनी केले.
येथील इकरा मेडिकल कॉलेज व पब्लिक स्कूल येथे भारत निवडणूक आयोगाच्या स्वीप मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वीप चे जिल्हा नोडल अधिकारी बी. जे. पाटील, सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी किशोर वायकोळे, डॉ. मिलिंद बागुल, प्रा. अतुल इंगळे, गट शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, गणेश शिवदे, फिरोज पठाण, रविकिरण बिऱ्हाडे, प्राचार्य डॉ. अब्दुल कुडूस, उपप्राचार्य डॉ. शोएब शेख डॉ. हारून बशीर, काझी जमृद्दिन आदि उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.नसीम आझमी, डॉ.अजीमुद्दिन काझी, डॉ.इक्बाल शेख, डॉ.समीना खान यासह प्राध्यापकेत्तर कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले.