जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील जिल्हा कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या गणेश नगर येथे राहणाऱ्या एका ७० वर्षीय वृध्द दांपत्य गेल्या ३० वर्षांपासून एका खाजगी जागेत तात्पुरत्या स्वरूपात झोपडी बांधून राहत आहे. दरम्यान तक्रारीनंतर महानगरपालिकेने आज मंगळवारी २८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान या वृध्ददांपत्याला मूलबाळ किंवा कोणीही नातेवाईक नाहीत. त्यामुळे आम्हाला आमच्या जागेवर राहू द्या, नाहीतर पर्यायी जागा उपलब्ध करून द्या अन्यथा आम्ही सामूहिक आत्महत्या करू असा इशारा दाम्पत्याने दिला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्हा कारागृहाच्या मागच्या बाजूला असलेले गणेश नगर येथे एका खाजगी जागेवर विश्वनाथ जगन्नाथ सुतार व त्यांची पत्नी जनाबाई विश्वनाथ सुतार हे गेल्या ३० वर्षांपासून झोपडी करून राहतात. दरम्यान मुळे जागेचा मालक यांनी झोपडी खाली करण्यासंदर्भात जळगाव महानगरपालिकेमध्ये तक्रारी अर्ज केला होता. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी आज मंगळवारी २८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता गणेश नगर येथील खाजगी जागेवरील तात्पुरती स्वरूपात बांधलेले झोपडी काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी वृद्ध दाम्पत्याने हे अतिक्रमण काढण्यास विरोध केला. तसेच आम्हाला मुलबाळ नाही किंवा आमचे कुणीही नातेवाईकही नाही, त्यामुळे आम्हाला इथेच राहू द्या, किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून द्या, नाहीतर आम्ही दोघं सामूहिक आत्महत्या करू असा इशारा दिला आहे. दरम्यान महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी वृद्ध दांपत्याच्या घरातील सर्व सामान ट्रॅक्टरमध्ये भरून जप्त करण्यात आला आहे.