यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूर व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रस्ते वाहतुकीचे सुरक्षा नियम तसेच याबाबतच्या जागृतीची माहिती देण्यात आली.
येथील न्यू इंग्लिश स्कूल व जुनि. कॉलेज भालोद या शाळेत आरएसपी अर्थात रोड सेफ्टी पेट्रोलिंग समिती प्रमुख बी. एन. पाटील व मुख्याध्यापक डी. व्ही. चौधरी यांच्या संयुक्त प्रयत्नांनी आर एस पी अंतर्गत इ.८वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांना रस्ते वाहतुकीचे नियम समजावेत, वाहतुकीचे नियम मोडल्यास काय दंड होऊ शकतात याची जाणीव व्हावी तसेच विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या संदर्भात सजग व जागृत कसे राहावे हे सांगण्यासाठी या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी फैजपूर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय निलेश वाघ, भुसावळ पोलीस स्टेशनच्या ए.पी.आय रूपाली चव्हाण, भुसावळचे पी.एस.आय. प्रमोद लोणे तसेच वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी पालवे व अप्पासाहेब पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होत.
े या प्रसंगी आयोजित एका सभेत संस्थेचे व्हा.चेअरमन मोहन चौधरी, सचिव नितीन चौधरी संचालक लीलाधर नारायण चौधरी, मुख्याध्यापक डी.व्ही चौधरी, पर्यवेक्षक आर. एस.जावळे आरएसपी समिती प्रमुख बी.एन. पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक डी. व्ही चौधरी यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक डी. एस. सुरवाडे यांनी केले.
आभार प्रदर्शन श्री डी.एस.देशमुख यांनी केले. भाषणात बोलताना सौ. रुपाली चव्हाण म्हणाल्या की आजचा विद्यार्थी हा भारताचा भावी नागरिक असल्याने त्याला रस्ते वाहतूक या अतिशय महत्त्वाच्या विषयासंदर्भात नियमांची माहिती असणे आवश्यक आहे,तसेच मुलींनीही आत्म संरक्षणासाठी सज्ज राहिले पाहिजे प्रत्येकाजवळ पोलीस स्टेशन चा नंबर असणे गरजेचे आहे,मोबाईलचा, इन्स्टाग्राम व फेसबुक यांचा अतिवापर टाळला पाहिजे, वेळेचे नियोजन करून शिक्षक व आई वडील यांच्यावर विश्वास ठेवून अभ्यास केला पाहिजे असे आवाहन केले. तर एपीआय निलेश वाघ यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती करून दिली.
भुसावळ चे पीएसआय श्री लोणे यांनी विद्यार्थ्यांना प्रवास करत असताना कोणती खबरदारी घ्यावी याचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात मोहन चौधरी यांनी अधिकारी वर्गाने सांगितलेल्या नियमांचे पालन विद्यार्थ्यांनी करावे असे आवाहन केले. तसे झाले तर भविष्यातील अनेक अडचणी समस्या व संकटे दूर होतील असे विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शिक्षक जी.एस.पाटील व शिक्षकेतर कर्मचारी निलेश चौधरी पंकज वानखेडे तृणाल परतणे दिनेश सरोदे व धवल महाजन यांनी केले. कार्यक्रम संपल्यावर रस्ते सुरक्षितते संदर्भात व वाहतुकीच्या नियमांसंदर्भात शाळेबाहेरील चौकातच प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता ८वी ते १२वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.