Home Cities रावेर डेरेदार लिंबाचे झाड अनधिकृतपणे तोडले; प्रांताधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार

डेरेदार लिंबाचे झाड अनधिकृतपणे तोडले; प्रांताधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर रोडवर राजेश मुरलीधर राणे यांच्या प्लॉटसमोर असलेले डेरेदार लिंबाचे झाड वन खात्याच्या संमतीने तोडण्यात आले. ही कारवाई श्री. राणे यांच्या अनुपस्थितीत झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

सदर झाड शेजारील व्यक्तीच्या परवानगीवरून तोडण्यात आले असले, तरी ते राजेश राणे यांच्या मालकीच्या जागेसमोर होते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी असा आरोप केला आहे की, संबंधित परवानगी चुकीच्या माहितीवर आधारित आहे. याप्रकरणी श्री. राणे यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, वृक्षतोडीच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आपल्या तक्रारीत राजेश राणे यांनी म्हटले आहे की, त्यांच्या अनुपस्थितीत शेजाऱ्यांनी वन विभागाची फसवणूक करून हे झाड तोडले. हे झाड अनेक वर्षांपासून त्यांच्या जागेचा भाग होते आणि त्याची सावली परिसरातील लोकांसाठी उपयुक्त होती. या प्रकारामुळे प्रशासनाच्या वृक्षतोड परवानगी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, नागरिकांनी या संदर्भात पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी केली आहे.


Protected Content

Play sound