नवी दिल्ली-वृत्तसेवा | आपल्या शायरीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महान शायर मुनव्वर राणा यांचे निधन झाले असून काल रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
मुनव्वर राणा यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बिघडलेली होती. मध्यंतरी तर त्यांची स्थिती चिंताजनक देखील झाली होती. काल रात्री नऊच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांचा मुलगा आणि मुलगी यांनी याबाबतची माहिती आज प्रसारमाध्यमांना दिली.
मुन्नवर राणा हे प्रसिद्ध शायर आणि कवी होते. उर्दू, हिंदी आणि अवधी भाषांमध्ये ते लिखाण करत असत. त्यांचे आईवरील काव्य हे अजरामर झालेले आहे. गजल आणि शायरील नवीन उंचीवर पोहचवण्याचे काम जनाब मुनव्वर राणा यांनी केले असून याचमुळे त्यांची महत्ता मानली जात आहे. त्यांच्या निधनाने शायरीतील एक तळपता तारा काळाच्या पडद्याआड गेला असून अनेक मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.