सावखेडा सिम येथे कायदेविषयक शिबीर उत्साहात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातीत सावखेडासिम येथे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव निमित्ताने कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास व्ही एस. डामरे सह दिवाणी न्यायाधिश करत यावल तसेच वकील मंडळी अॅडव्हेकेट अॅड जी. एम. बारी. अॅड. एन. पी. पाटील, अॅड एन. पी. मोरे, काठोके ग्रामसेवक, अॅड स्वाती पाटील, अॅड. मोनिका सावकारे हे हजर होते. अॅड जी. बारी यांनी जी. एस. टी बाबत व ग्राहक हक्काबाबत माहिती दिली. तसेच अध्यक्षीय भाषण व्ही. एस. डामरे ( सहदिवाणी न्यायाधिश के स्तर) यावल यांनी केले. त्यांनी लोक-न्यायालया संदर्भात व मेडिऐशनचा कायदा तसेच शेतीच्या वहिवाटी व शेतीच्या कायदयाबददल व तत्त्वाबद्दल व रस्त्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मध्यस्थीचे फायदे, रस्ते वाहतुक संबंधी कायदे व सायबर लॉ या संबंधी सविस्तर माहिती देवून मोलाचे मार्गदर्शन केले. अॅड. एन. पी. मोरे यांनी शेती वहिवाटीचा कायदा व मोटर वाहन कायदा याबद्दल माहिती दिली. काठोके ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतीच्या योजना व अन्य शासकीय योजनाबाबत मोलाची माहिती दिली.

सदर कार्यक्रमास विधी समांतर सहाय्यक हेमंत फेगडे हे हजर होते व त्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुरविलेले पत्रकाचे उपस्थितामध्ये वितरण केले. सदर कार्यक्रमास न्यायालयीन कर्मचारी  के. के. लोंढे,  राहुल रायपुरे यांनी सहकार्य केले. तदनंतर विधी समांतर सहाय्यक व वकील संघाचे सदस्य व उपस्थित ग्रामस्थ यांचे हस्ते पत्रके वाटप केली. सदर शिबीराचा सुमारे ८० लोकांनी लाभ घेतला.

 

Protected Content