मुक्ताईनगरात महिला दिनानिमित्त व्याख्यान

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्रीमती जी.जी. खडसे महाविद्यालय व एस.पी.डी. एम. महाविद्यालय, शिरपूर यांच्या आपसी सामंजस्य करारांतर्गत ८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आभासी पद्धतीने व्याख्यानपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षीय मनोगतातून प्रभारी प्राचार्य डॉ. एच.ए. महाजन यांनी आजच्या या जागतिकीकरणाच्या युगात महिलांचे योगदान हे महत्त्वपूर्ण असून आजही एक महिला म्हणून महिलेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा संकुचित आहे. अशावेळी महिलांचा सन्मान करायला शिका असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. प्रस्तुत कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. वर्मा, एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर यांनी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात अनेक सामाजिक समस्या निर्माण झालेल्या आहेत.

त्यात विभक्त कुटुंब पद्धती, लिव्ह-इन-रिलेशनशिप पद्धतीमुळे विवाहसंस्थेला निर्माण झालेला धोका, खाद्यसंस्कृती व समाज संस्कृतीमध्ये झालेले बदल आदी.या सर्व समस्या सोडविण्याची ताकत फक्त महिलांचा आहे. तेव्हा हे सर्व संस्कार जपण्याचे कार्य फक्त स्त्रीच करू शकते आणि ती प्राचीन काळापासून आजपर्यंत स्त्री संस्कृती जपत आलेली आहे. परंतू मध्यंतरीच्या काळात या स्त्री संस्कृतीकडे काही अंशी दुर्लक्ष झालेले दिसते.

अशा प्रसंगी भारतीय स्त्रियांनी भारतीय स्त्री संस्कृती जपली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. प्रस्तुत कार्यक्रमाच्या प्रसंगी एस. पी. डी. एम.महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व्ही.एम. पाटील, इतिहास विभागातील प्राध्यापक वृंद तसेच खडसे महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.ए. पी. पाटील व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. पी.एस. प्रेमसागर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. डी. आर.कोळी यांनी केले.

 

Protected Content