अनोरे विद्यालयात व्याख्यानमाला उत्साहात

dharangaon

धरणगाव प्रतिनिधी । येथील अनोरे विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी व्याख्यानमाला सत्राचे आयोजन आज (दि.2) करण्यात आले होते.

व्याख्यानमालेचे प्रथम सत्रात इंग्रजी या विषयाचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी व्याख्याते म्हणून निळकंठेश्वर हायस्कूल चावलखेडाचे ज्येष्ठ शिक्षक के.डी.पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एम.एच.चौधरी होते. यावेळी ए.के.पाटील, आर.बी.महाले आणि कल्पेश वारुळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्गशिक्षक बी.आर.महाजन यांनी केले.

Protected Content