जाणून घ्या श्रीं’ची स्थापनेचे मुहूर्त !

ganesha

 

जळगाव प्रतिनिधी । आज गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे आगमन झाले आहे. परंतू कोणत्या मुहुर्तावर ‘श्रीं’ची स्थापना व पुजन करावे. यासाठी आज दिवसभरात काही विशेष मुहूर्त आहेत.

आज, सोमवारी, गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे ५ वाजल्यापासून दुपारी १ वाजून ५२ मिनिटांपर्यंत कधीही श्रीगणेशमूर्ती स्थापना व पूजन करावे असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. गणेशमूर्ती स्थापना आणि पूजन राहूकाल व भद्राकालात करता येते हेही त्यांनी स्पष्ट केले. गुरुवारी, ५ सप्टेंबर रोजी दिवसभर अनुराधा नक्षत्र असल्याने दिवसभर कधीही ज्येष्ठा गौरी आणता येतील. शुक्रवारी, ६ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन आहे. तर, शनिवारी, ७ सप्टेंबर रोजी दिवसभर मूळ नक्षत्र असल्याने दिवसभर कधीही ज्येष्ठा गौरी विसर्जन करता येईल.

 

Protected Content