शेगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | हॉट सीट हा कार्यक्रम संत नगरीच्या इतिहासात प्रथम घेण्यात आला व याला जनतेने व नेत्यांनी उस्फूर्त प्रतिसाद देत हॉट सीटवर येणारे नेते न. प. निवडणुकीकरिता सज्ज असल्याची प्रतिक्रिया कार्यक्रमात मुख्य न्यायाधीशाची भूमिका पार पाडताना आवृत्ती संपादक राजेश राजोरे यांनी दिली.
प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक व वेब मीडिया च्या संयुक्त विद्यमाने आयोजित हॉटसीटपुढे बोलताना ते म्हणाले कि, जनतेच्या मनातील प्रश्न पत्रकारांच्या चौकटीत नेत्यांना विचारल्यावर काही प्रामाणिक उत्तरे दिली. आणि काही गोलमाल आली असली तरी या हॉट सीटवर जनतेच्या समक्ष येण्याचे धाडस या नेत्यांनी केले हे महत्त्वाचे आहे. असे कार्यक्रम घेतले गेले पाहिजेत. निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपला जाहीरनामा दिलावर तो पूर्णत्वास नेणे आवश्यक असून त्यामुळेच गावाचा सर्वांगीण विकास पूर्ण होईल. या हॉट सीटवर भाजपचे अजून काही नेते व शिवसेनेसह इतर पक्षाचे नेते यायला पाहिजे होते. याची खंत ही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
गांधी चौकातील खुल्या मैदानात प्रिंट मीडिया ,इलेक्ट्रॉनिक व वेब मीडिया च्या संयुक्त विद्यमाने हॉटसीट कार्यक्रम घेण्यात आला. या हॉट सीटवर सुरुवात जनतेचे प्रतिनिधित्व करणारे राजकीय विश्लेषक प्राध्यापक डॉ विनोद गायकवाड यांच्या प्रकट मुलाखतीने करण्यात आली.
या हॉट सीटवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दिनेश साळुंके, वंचितचे प्रभाकर पहुरकर , भाजपचे नितीन शेगोकार तर काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण देशमुख व माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील यांनी जनतेच्या समोर येत प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी विशेष उपस्थिती खामगाव मतदार संघाचे काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर पाटील यांची होती. भाजपचे पांडुरंग बुच उपस्थित होते. परंतु त्यांना गळ्याचा त्रास असल्यामुळे प्रश्न उत्तरे होऊ शकली नाहीत. भाजपचे माजी सभापती पवन महाराज शर्मा उपस्थित राहू शकले नाही.
या कार्यक्रमात निष्पक्षपाती जजमेंटसाठी न्यायाधीशाच्या भूमिकेत देशोन्नतीचे आवृत्ती संपादक राजेश राजोरे, प्रश्नकालचे व्यवस्थापकीय संपादक सतिश दूढे, मराठी मनाचा आवाज चे संपादक अविनाश दळवी, व वर्हाडी आवाजचे संपादक महेंद्र व्यास यांनी चांगल्या प्रकारे निभावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तरुण भारत प्रतिनिधी नानाराव पाटील यांनी, सूत्रसंचालन नंदकिशोर माळी यांनी केले. हॉट सीटवर जनतेच्या प्रश्नांचा मारा करण्याकरिता मीडिया रिपोर्टर महेंद्र मिश्रा, अमोल सराफ, समीर देशमुख, पत्रकार नानाराव पाटील , रोहित देशमुख, ज्ञानेश्वर ताकोते यांनी हॉट सीटवर नेत्यांना प्रश्न विचारीत नेत्यांना घाम फोडला. यावेळी पत्रकार राजेश चौधरी, संजय त्रिवेदी, फईम देशमुख, सचिन कडूकार, शाम देशमुख, प्रशांत खत्री, अमर बोरसे, भावेश शर्मा, उमेश राजगुरे, ललित देवपूजारी, कमलेश शर्मा आदीनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. खामगाव आयबीएन चे प्रतिनिधी राहुल खंडारे व कुणाल देशपांडे यांची उपस्थिती होती.
जनतेसमोर येण्यास टाळाटाळ
मागील न. प. मध्ये शिवसेनेचे चार नगरसेवक आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे असूनही शिवसेनेचे स्थानिक नेते तसेच एमआयएम, प्रहार संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जनतेसमोर येण्यास टाळले असल्यामुळे जनतेत चांगलीच चर्चा रंगली आहे.