Home Cities जळगाव विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस १ जुन रोजी जिल्हा दौऱ्यावर

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस १ जुन रोजी जिल्हा दौऱ्यावर

0
24

रावेर प्रतिनिधी । रावेरसह मुक्ताईनगरात आलेल्या चक्रीवादळामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेला आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा दि. १ जून रोजी जळगाव जिल्ह्यात येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांनी दिली आहे.

 या दौऱ्यामध्ये जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीषभाऊ महाजन, भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे,खासदार रक्षाताई खडसे,जिल्हा परिषद अध्यक्ष रंजनाताई पाटील, प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ  डॉ.राजेंद्रजी फडके, अशोकभाऊ कांडेलकर किसान मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश धनके, नंदूभाऊ महाजन, पद्माकरभाऊ महाजन, हर्षलभाऊ पाटील, सभापती जयपाल बोदडे, डी. एस चव्हाण सर ,संतोष खोरखडे तालुका अध्यक्ष राजन लासुरकर ,तालुकाध्यक्ष प्रफुल जवरे ,सभापती कविताताई कोळी, गोपाळ नेमाडे व या भागातील लोकप्रतिनिधी भाजपा पदाधिकारी हे सोबत असतील. 

 


Protected Content

Play sound