उल्लेखनिय कामगिरीसाठी एलसीबी पथकाचा सन्मान

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील इतर गुन्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे शुक्रवार १० डिसेंबर रोजी दुपारी अप्पर पोलिस महासंचालक विनय कारगावकर यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर व पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे उपस्थित होते

अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे २६ नोव्हेंबर रोजी कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी (वय-३०) रा. फरकांडे ता. एरंडोल या तरूणाला खून करून सोबत सेलेले ७ लाखाची रोकड लांबविली होती. या गुन्ह्यातील संशयित सहा संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. या गुन्ह्याच्या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक प्रतापराव शिकारे, पो.नि. शंकर शेळके, पोहेकॉ राजेश मेढे, जितेंद्र पाटील, अश्रम निजामोउद्दीन, जयंत चौधरी, कमलाकर बागुल, अक्रम शख, नितीन बाविस्कर, विजय पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील, दर्शन ढाकणे, सचिन महाजन यांचा प्रशस्तिपत्र देवून सत्कार करण्यात आला.

दुसऱ्या घटनेत, पहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतकरी कापूस विक्री करून ७ लाख रूपये घरी घेवून जात असतांना पाच जणांनी पिस्टलचा धाक दाखवून रोकड लुटली होती. या गुन्ह्यातील पो.नि. अशोक उतेकर, चंद्रसेन पालकर, जालिंदर पळे, राजेंद्र पाटील, विलास पाटील, विजयसिंग पाटील, लक्ष्मण पाटील, नितीन राऊते, राजेंद्र पाटील, किरण पाटील, राहूल पाटील, प्रितमकुमार पाटील, उमेशगिरी गोसावी, स्वप्निल चव्हाण, रमेश जाधव आदींचा सत्कार करण्यात आला.

त्यांच्या या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे शुक्रवार १० डिसेंबर रोजी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्यासह पोउनि अमोल देवढे, पोहेकॉ  सुनिल दामोदरे, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, पो.ना. विनोद पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, श्रीकृष्ण देशमुख, इश्वर पाटील, राजेंद्र पवार, मुरलीधर बारी  यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.

याशिवाय जिल्ह्यातील इतर गुन्ह्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे संबधित अधिकारी व कर्मचारी यांचा देखील यावेळी राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक विनय कारगावकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गाचे मनोबल वाढीस लागले आहे.

 

Protected Content