Home क्राईम पाचोरा : अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पाचोरा : अवैध धंद्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


Crime 21

पाचोरा (प्रतिनिधी)। शहरात राधास्वामी पेट्रोल पंपच्या समोर दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीस स्वतःच्या फायद्याकरता कल्याण मटका नावाचे सट्टा जुगाराचे आकडे लावून आकड्यावर लोकांवर सट्टा अंक लावून पैसे स्वीकारून जुगाराचा खेळ खेळत होते. याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाप्पू रोहम यांना मिळाल्यानंतर त्यांनी एकनाथ बागुल, अनिल देशमुख, विलास पाटील, किशोर राठोड यांना कारवाईच्या सुचना दिल्यात. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस कॉस्टेबल नितीन तायडे हे करीत आहे. याबाबत गोपनिय शाखेला माहिती दिल्यानंतर पोलीसांनी छापा टाकून रोख 2 हजार 160 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी संतोष पांडूरंग पाटील याला चौकशीकरीता ताब्यात घेतले आहे. पुढील तपासा पो.कॉ नितीन तायडे करीत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound