वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर एलसीबीची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौक परिसरातून अवैधपणे वाढू वाहतूक करणाऱ्या डंपर वर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता आकाशवाणी चौकात गस्तीवर असताना डंपर क्रमांक (MH 19 Z 7774) हा संशयास्पद फिरत असताना मिळून आला. त्यानंतर पोलिसांनी डंपरची चौकशी केली असता त्यामधून अवैधपणे वाढू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.

नुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डंपर हा जप्त केला आहे. करणे वाहनचालक रवींद्र राजू सोनवणे वय 26 आणि योगेश किरण रंधे व 19 दोन्ही राहणार सावखेडा तालुका जळगाव यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content