अमळनेर प्रतिनिधी । लायन्स क्लब व श्री ॲक्सिडेंट हॉस्पिटल अमळनरतर्फे मशीनद्वारे हाडांचे तपासणी व डॉक्टरंचे मार्गदर्शन शिबीर उत्साहात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन शल्य चिकित्सक डॉ. अनिल शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. व उपस्थित रूग्णांना वैदकिय मार्गदर्शन केले. लायन्स क्लब अध्यक्ष प्रशांत सिंघवी यांनी शिबिराचे महत्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. मशीनद्वारे हाडांची ठिसूळपणा तपासणी करून, त्यांची रिपोर्ट पेशंटला देण्यात आली. आलेल्या रिपोर्ट तपासुन व त्या संदर्भात मार्गदर्शन ऑर्थपीडिक सर्जन, लायन्स सदस्य डॉ. सुमित सूर्यवंशी यांनी केले.
सदर तपासणी मशीन डॉ. सुमित सूर्यवंशी यांनी उपलब्ध करुन दिले. शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरीकांची उपस्थिती होती. सुमारे १६० रूग्णांची तपासणी व मार्गदर्शन शिबिरात करण्यात आले. या शिबिरात लायन्स अध्यक्षला प्रशांत सिंघवी, सेक्रेटेरी डॉ. संदीप जोशी, डॉ.सुमित सूर्यवंशी, पंकज मुंदड़ा, डॉ.मिलिंद नवसारिकर, राजु नांधा, जयप्रकाश पाटील, अनिल रायसोनी, डॉ. बी.आर बाविस्कर, बजरंग अग्रवाल, डॉ.पी.के. ओसत्वाल, नीरज अग्रवाल, राजेशभाई शाह, डॉ. रविंद्र जैन, महेंद्र पाटील, प्रकाश शाह, एच.डी. भरूचा, सुरेश कुंदनानी, डॉ. देशमाने, जितेंद्र जैन, दिलीप गांधी, उदय शाह, योगेश मुंदडा, डॉ. रविंद्र कुळकर्णी, जितेंद्र गोहिल, अजय हिंदुजा, कंचन शाह, जितेंद्र पारख, कमलेश भंडारी व ईतर लायन्स सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.