नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक अनियमिततेचे कारण देऊन ९३ वर्षे जुनी लक्ष्मीविलास बँकेवरही (एलव्हीबी) आर्थिक निर्बंध (पीसीए) घातले आहेत. त्यामुळे आता नव्याने कर्जे देणे आणि शाखांचा विस्तार करण्यात लक्ष्मीविलास बँकेला मोठ्या अडचणी येणार आहेत.
लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध घालण्यामागे, कोणत्याही आर्थिक संकटाशी सामना करण्याची कुवत नसणे, मोठ्या प्रमाणातील थकीत कर्जे आणि दोन वर्ष सातत्त्याने ‘अॅसेट क्वालिटी’त झालेली घसरण ही तीन मुख्य कारणे असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेवरील रिझव्र्ह बँकेच्या आर्थिक र्निबधानंतर देशातील सहकार क्षेत्रात गुंतवणूकदार, ग्राहक, खातेदारांमध्ये संतापाची भावना असतानाच लक्ष्मी विलास बँकेच्या घडामोडींची भर पडली आहे.